मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

💁‍♂💢 मराठी विषयासाठी उपयुक्त💢💁‍♂
---------------------------------------------------
🕳☄ ⭕ अवयवाशी संबंधित
वाक्प्रचार आणि म्हणी व त्यांचे अर्थ⭕🕳☄
---------------------------------------------------
✳ 👂 कान व ✳✋ हात
         ह्या अवयवाशी  संबंधित       
---------------------------------------------------
   👂🔻 'कान' ह्या अवयवाशी संबंधित
       वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 👂🔻
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🇵  🇻 🇮 🇳 🇲 🇴 🇷 🇪

१) कान झाकून घेणे- न ऐकणे,बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.
२) कानात बोळे घालणे- मुद्दाम न ऐकणे.
३) कानपिचक्या देणे- दोष दाखवण्यासाठी समज देणे.
४) कानीकपाळी ओरडणे- वारंवार बजावून सांगणे.
५) कानी लागणे- एखाद्याच्या गुप्तपणे चहाड्या करणे.
६) कान फुंकणे- दुसऱ्याची निंदानालस्ती करणे.
७) कान भरणे- एखादयाविषयी संशय किंवा गैरसमज निर्माण करणे.
८) कर्णोपकर्णी होणे- सर्वांना समजणे.
९) कानाखाली वाजवणे- मारणे,कानशिलात भडकावणे.
१०) कान उपटणे- समज देणे,अद्दल घडवणे.
११) कान धरणे- शिक्षा करणे किंवा चूक कबूल करणे.
१२) कान फुटणे- अजिबात ऐकू न येणे,बहिरे होणे.
१३) कान किटणे- एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळणे.
१४) कान देणे- लक्षपूर्वक ऐकणे.
१५) कानठळ्या बसणे- कर्कश आवाजामुळे ऐकू न येणे.
१६) हलक्या कानाचा असणे- खोटी गोष्ट लगेच खरी वाटणे.
१७) कानात बोटे घालणे- नको असलेली भयंकर गोष्ट न ऐकणे.
१८) कानमंत्र देणे- गुप्तपणे सल्ला देणे.
१९) कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
२०) कानाला खडा लावणे- पुन्हा चूक होऊ नये म्हणून दक्ष राहणे.
२१) कानावर हात ठेवणे- माहित नसल्याचे सांगणे.
२२) कानउघडणी करणे- स्पष्टपणे खरे बोलून दम देणे.
२३) कान टवकारणे- लक्षपूर्वक ऐकणे.
२४) या कानाचे त्या कानाला कळू न देणे- गुपित राखणे.
२५) कानकोंडे वाटणे- शरम वाटणे.
🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳 🇲 🇴 🇷 🇪
---------------------------------------------------
    👂🔻 कान या अवयवाशी संबंधित
          म्हणी व त्यांचे अर्थ🔻👂
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🅿®🅰♈📍🎵.Ⓜ⭕®📧

१) कानामागून आली नि तिखट झाली- मागून येऊनही प्रसिद्ध पावणे.
२) एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे- एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे.
३) सोनाराने टोचले कान- योग्य माणसाने समज देणे व दोष दाखवणे.
४) गाढवाला दिला मान नि त्याने केले उंच कान- एखाद्या मूर्खाला मान दिला की,तो गोंधळ घालतो.
५) भिंतीला कान असतात- कोणतीही गोष्ट लपून राहत नाही; ती कधीतरी माहित होतेच.
---------------------------------------------------
🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳 🇲 🇴 🇷 🇪

✋🔻 'हात' ह्या अवयवाशी संबंधित
       वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ✋🔻
१) हात आवरणे- मदत थांबवणे.
२) हात ओला करणे.- लाच देणे.
३) हातघाईवर येणे.- मारामारी करणे.
४) हात चालणे.- पटपट काम करणे.
५) हात दाखवणे- सामर्थ्य दाखवणे.
६) हात धुवून घेणे.- स्वार्थ साधणे.
७) हात पसरणे- भीक मागणे.
८ ) हातपाय मोकळे करणे- फिरायला जाणे.
९) हातावर तुरी देणे- फसवून पळून जाणे.
१०) हातापाया पडणे- गयावया करणे.
११) हातावर पोट भरणे.- अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणे.
१२) हात उगारणे- मारायला प्रवृत्त करणे.
१३) हातखंडा असणे- कौशल्य असणे.
१४) हात गगनाला पोचणे- मोठे कार्य करणे.
१५) हात दगडाखाली सापडणे- अडचणीत असणे.
१६) हात देणे- मदत करणे.
१७) हात धुवून पाठीस लागणे- चिकाटीने काम करणे.
१८) हातपाय गळणे- निराश होणे.
१९) हातपाय हलवणे- उद्योग करणे.
२०) हातावर शीर घेणे.- मरणास तयार असणे.
२१) हातावर हात मारणे- संमती देणे.
२२) हातावर पोट भरणे- अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणे.

🅿®🅰♈📍🎵Ⓜ⭕®📧
---------------------------------------------------
✋🔻 हात या अवयवाशी संबंधित
          म्हणी व त्यांचे अर्थ🔻✋
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) आत फिरे तिथे लक्ष्मी फिरे- ज्या घरी स्वच्छता असते त्या घरी धनधान्य,संपत्ती भरपूर असते.
२) हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये- दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावू नये.
३) हातच्या कंकणाला आरसा कशाला?- जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
४) हाती काम मुखी नाम- देवाचे नाव व उद्योग एकाच वेळी सुरु असणे.
५) हातावर कमवावे,पानावर खावे- रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा.
६) जिथे राबती हात तेथे हरी- जिथे श्रम केले जातात तिथे देवाचा वास असतो

6 comments:

  1. अतिशय दर्जेदार हा ब्लॉग मला पाहून खूप आनंद झाला आपण खूप चांगला कार्यकर्ता शिक्षक आहात यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे

    ReplyDelete
  2. मस्त आहे हे सर.मुलांना उपयोगी आणि अभ्यासक दृष्टीने तयार केलेले हे तुमचे काम मला खुप आवडले सर.

    ReplyDelete
  3. मस्त आहे हे सर.मुलांना उपयोगी आणि अभ्यासक दृष्टीने तयार केलेले हे तुमचे काम मला खुप आवडले सर.

    ReplyDelete
  4. thanks apke vaje se mera project hogaya
    thanks a lot#

    ReplyDelete
  5. सब है पर कानावर येणे न्ही है 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

    ReplyDelete
  6. १. मारामारी करणे.

    ReplyDelete